पनवेल परिसरात दोन वेगवेगळ्या अपघातात 2 ठार 1 जखमी....
पनवेल परिसरात दोन वेगवेगळ्या अपघातात 2 ठार 1 जखमी....

पनवेल, दि.18 (संजय कदम) ः पनवेल परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात 2 ठार 1 जखमी झाल्याची घटना घडली आहे.
पनवेल जवळील जेएनपीटी मार्गावरील बंबावी पाडा येथील साई विभुती ढाब्यासमोर आज सकाळी एका ट्रेलरने त्याच्या पुढे चाललेल्या होंडा डिओ स्कुटी गाडीस पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात फिर्यादी निलेश कमल सिंग (25) हा जखमी झाला आहे तर त्याचा सहकारी अक्षय घोले (25) हा गंभीररित्या जखमी होवून मयत झाला आहे. तर दुसर्‍या घटनेत पनवेल शहरातील मालधक्का रोड येथून पायी जात असलेल्या मुंबई दलात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत असणारे शिवाजी सानप यांना एका अज्ञात वाहनाची धडक बसून ते गंभीररित्या जखमी झाले. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले असता तेथे त्यांचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही अपघाताची नोंद  पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments
Popular posts
दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान...
Image
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
Image
महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल....
Image
खांदा कॉलनी युवासेने तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....
Image
मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केला जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धेत कांस्यपदक विजेते सुभाष पुजारी यांचा विशेष सत्कार....
Image