केंद्रीय नौकानयन मंत्री मनसूख मांडरीया यांना बी. एम. एस. पोर्ट महासंघाचे निवेदन..
        
पनवेल / वार्ताहर :- केंद्रीय नौकानयन मंत्री मनसूख मांडरीया यांचा आज सिरम इंस्टीटयुट पुणे येथे भेट देण्यासाठी  दौरा असताना त्यांना देशातील विविध पोर्ट मधील परमनंट व कंत्राटी कामगारांनी कोविड काळात काम केलेल्या कामगारांना कोविड भत्ता मिळावा व कामगारांची पगारवाढ लवकरात लवकर करावी या मागणी संदर्भात पुणे येथे B.M.S. च्या राष्ट्रीय नेत्यांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा करून निवेदन दिले. 

यावेळी मुंबईचे खासदार मनोज कोटक, B.M.S. चे राष्ट्रीय नेते आण्णा धुमाळ, B.M.S. पोर्ट महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुरेश पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
Comments