पनवेल दि. ०९ (संजय कदम)- पनवेल परिसरातून दोन अल्पवयिन मुलींना फूस लावून पळवून नेल्याची घटना घडल्याने पालक वर्गात भीतीयुक्त वातावरण आहे.
करंजाडे से.-4 येथे राहणारी 15 वर्षे 10 महिन्यांची मुलगी हि राहत्या बिल्डींगच्या खाली दूध आणण्यास खाली आली असता कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणाकरीता त्या मुलीस फूस लावून पळवून नेल्याची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. ती रंगाने सावळी, चेहरा उभट, डोक्याचे केस काळे व मध्यम, गळ्यात काळ्या रंगाचा धागा, अंगाने मध्यम, उंची 5 फूट असून उजव्या हातात लोखंडी कडे, डाव्या हाताच्या मनगटावर इंग्रजी भाषेत नाव गोंदलेले आहे. हिच्या अंगात गुलाबी रंगाचा टिशर्ट व खाकी रंगाची लेगिन्स, पॅरेगॉन कंपनीची प्लॅस्टिक चप्पल, डाव्या पायात काळ्या रंगाचा धागा आहे. तर दुसऱ्या घटनेत तालुक्यातील कोपरोली येथील के.के. बिल्डींग साईट परिसरात राहणारी 15 वर्षे 8 महिन्यांची मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार पनवेल तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. उंची 4.5 फूट, रंग गोरा, चेहरा गोल, डोक्याचे केस काळे व बारीक, डोळे काळे, नाक सरळ, बांधा पातळ असून नाकात सोन्याची चमकी, डाव्या पायात काळ्या रंगाचा धागा आहे. अंगात काळ्या रंगाचा टिटॉप व काळ्या रंगाची लेगिन्स आहे. पायात सॅंडल असून तिला मराठी व हिंदी भाषा अवगत आहे.