विद्या चव्हाण यांची महिला सुरक्षा संघटना महाराष्ट्र राज्याच्या पनवेल उपाध्यक्षापदी नियुक्ती...

पनवेल, दि. १८ (संजय कदम)- महिला सुरक्षा संघटना महाराष्ट्र राज्याच्या पनवेल उपाध्यक्षापदी सामाजिक कार्यकर्त्या विद्या भास्कर चव्हाण यांची नियुक्ती करून त्यांना प्रदेशाध्यक्ष किसनराव पाटील यांनी नियुक्तीपत्र दिले आहे.
         विद्या चव्हाण यांनी आत्तापर्यंत केलेले सामाजिक व राजकीय कार्य महिलांवरील अन्याय, अत्याचार, लैंगिक शोषण, कौटुंबिक हिंसाचार व अशा अनेक महिलांच्या समस्यांचे निराकरण केल्याबद्दल तसेच आगामी काळातही अशा महिलांना संघटनेच्या वतीने महिला समुपदेशन केंद्र तथा महिला निवारण केंद्र सुरू करून त्यांना न्याय देतील या उद्देशाने त्यांना हे नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. या त्यांच्या नियुक्तीबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
Comments