पनवेल, दि.१७ (वार्ताहर)- रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा योगीता पारधी यांच्या सहकार्यामुळे तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत पारगाव याठिकाणी कोव्हिड-19 व्हॅक्सिन उपलब्ध झाल्यामुळे त्याचा फायदा ग्रामस्थांना झाला आहे.
रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा योगीता पारधी यांनी ग्रुप ग्रामपंचायत पारगाव, ता- पनवेल, या पंचायतला एकूण 86 लोकांची कोव्हिड-19 ची व्हॅक्सिन दोन टप्प्यात उपलब्ध करून दिली. ही व्हॅक्सिन घेण्यासाठी ओवळे गावचे उद्योगपती तसेच सामाजिक कार्यकर्ते रायगड जिल्हा उपाध्यक्ष (काँग्रेस) नंदराज शेठ मुंगाजी व ग्रुप ग्रामपंचायत पारगावचे माजी उपसरपंच मनोज शेठ दळवी तसेच ग्राम पंचायत हद्दीतील नागरिक उपलब्ध होते. यासाठी सरपंच अहिल्ल्या बाळाराम नाईक यांनी सातत्याने जिल्हा परिषदेकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला. यासाठी पंचायत समिती पनवेलचे आरोग्य अधिकारी डॉ.नखाते, गव्हाण विभागीय आरोग्य अधिकारी डॉ.आस्मिता पाटील, डॉ.जोशी, डॉ.चौधरी व डॉ.पाटील, आशा वर्कर यांनी मोलाचे सहकार्य केले.
तसेच यावेळी मार्गदर्शक म्हणून सरपंच अहिल्या बाळाराम नाईक ,उपसरपंच अंजली राहुल कांबळे , माजी उपसरपंच मनोज राम दळवी, माजी उपसपंच सुशीलकांत बाळकृष्ण तारेकर, सदस्या निशा रत्नदीप पाटील, सदस्या ग्रामविकास अधिकारी मोकल, कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते बाळाराम शेठ नाईक, रत्नदीप पाटील, तंटा मुक्ती अध्यक्ष सदाशिव पाटील हे उपस्थित होते.
कोट-
रायगड जिल्हा परिषद व आरोग्य विभागाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीसाठी उपलब्ध करून दिलेल्या व्हॅक्सिनबद्दल त्यांचे ग्रामपंचायतीच्या वतीने आभार मानत आहे. -
सरपंच अहिल्या बाळाराम नाईक