खांदा वसाहतीत सेनेचे शिवसंपर्क अभियान ; वृद्धाश्रम आणि झोपडपट्टीत फळ वाटप...
पनवेल, दि.१६ (वार्ताहर) पक्षसंघटना वाढीच्या दृष्टिकोणातून शिवसेनेच्या वतीने राज्यभर शिव संपर्क अभियान घेण्यात येत आहे. त्याची सुरुवात खांदा वसाहतीत करण्यात आली. शहर प्रमुख सदानंद शिर्के यांच्यासह इतर स्थानिक पदाधिकार्‍यांनी वृद्धाश्रम आणि झोपडपट्टीत फळ वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हा प्रमुखांची बैठक घेतली. जिल्हानिहाय  त्यांनी आढावा घेतला. त्याचबरोबर आगामी महानगरपालिका, नगरपालिका तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकां संदर्भातही जिल्हाप्रमुखांची  मत जाणून घेतली. त्याचबरोबर पक्षसंघटना वाढीच्या दृष्टिकोनातून या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानुसार शिव संपर्क अभियान राज्यभर राबविण्यात येणार आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातही या अभियानाला सुरुवात झाली आहे. खांदा वसाहतीत शहरप्रमुख सदानंद शिर्के यांच्यासह इतर स्थानिक पदाधिकार्‍यांनी जनसेवा वृद्धाश्रम त्याचबरोबर दिवा पनवेल रेल्वे मार्गालगत असलेल्या झोपडपट्टीत फळवाटप केले. शिर्के यांच्या कन्या सोनल हिच्या वाढदिवसाचा दुहेरी योग साधून हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. यावेळी शिवसेना विधानसभा संघटक  दिपक निकम, शहरप्रमुख सदानंद शिर्के , उपशहरप्रमुख दत्तात्रेय महामुलकर,संपत सुवर्णा, उपशहरसंघटक संजीव गमरे, उपविभाग प्रमुख जयराम खैरे, विभाग संघटक श्रीहरी मिसाळ, उपविधानसभा अधिकारी सुशांत सावंत, युवासेना उपशहर अधिकारी आदीत्य मेमाने, शाखाप्रमुख सुनील औटी, सचिन धाडवे, मंगेश पवार, पुंडलिक म्हात्रे, उपशाखाप्रमुख भास्कर साळवी, गणेश साबळे, जयवंत भायदे, गटप्रमुख केशव सुवरे, शाखा अधिकारी सौरव महामुलकर, ऋषीकेश घुले, जेष्ठ शिवसैनिक तानाजी घारे, दत्ताराम पाटील,भोजराज होटकर, माजी शाखा प्रमुख रामदास गोंधळी सायली शिर्के उपस्थित होते.

Comments