पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रं १५ मध्ये महायुतीचे दशरथ बाळू म्हात्रे यांची विजयाकडे वाटचाल...
पनवेल महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक १५ मधून तरुण तडफदार युवा नेतृत्व म्हणून दशरथ बाळू म्हात्रे यांनी निवडणूक रिंगणात उतरताच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.त्यांचा प्रचार हा विजयी प्रचार मानला जात आहे. नागरिकांचा देखील त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
सामाजिक कार्याचा ठसा आणि तरुणाईला प्रेरणा देणारी कार्यपद्धती यामुळे दशरथ म्हात्रे यांचे नाव प्रभागात चर्चेचा विषय ठरत आहे. नेतृत्व गुण,लोकांसाठी झटण्याची वृत्ती , स्थानिक प्रश्नांची सखोल जाण, सर्वसामान्य नागरिकांशी थेट संवाद आणि विकासाभिमुख दृष्टिकोन ही त्यांची ओळख आहे.
पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, युवकांसाठी रोजगाराच्या संधी आणि महिलांच्या सुरक्षिततेसारख्या मुद्द्यांवर त्यांनी स्पष्ट भूमिका, सामाजिक कार्यक्रम, बस थांबे, आरोग्य शिबिर, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात करण्यात आले आहे.
त्यामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये दशरथ म्हात्रे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, “तरुण नेतृत्वाला संधी मिळाली पाहिजे” अशी भावना मतदारांमध्ये दिसून येत आहे. विविध सामाजिक उपक्रमांमधील त्यांचा सहभाग आणि लोकहिताच्या प्रश्नांवरील सातत्यपूर्ण पाठपुरावा यामुळे त्यांची प्रतिमा विश्वासार्ह राहिली असून त्यांच्या सोबत इतर तीन उमेद्वार असून दशरथ म्हात्रे यांचा विजय निश्चित मनाला जातं असून प्रचारात मुसंडी घेताना दिसत आहेत.त्यांच्या प्रचाराची वाटचाल विजयाकडे जात असल्याचा नागरिकांचा मत प्रवाह दिसत आहे.