शिवसंपर्क अभियानांतर्गत उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागात दौऱ्याचे आयोजन....

शिवसंपर्क अभियानांतर्गत ग्रामीण भागातील शिवसैनिक, पदाधिकारी व जनतेच्या समस्या घेतल्या जाणून 

पनवेल वैभव : (अनिल कुरघोडे)  शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना सल्लागार बबनदादा पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत, यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसंपर्क अभियानंतर्गत दौऱ्याचे ग्रामीण भागात आयोजन करण्यात आले होते.

शुक्रवार दि.१६ जुलै रोजी ग्रामीण भागातील मौजे नितळस, खैरणे, वावंजे, कुत्तरपाडा, चिंध्रण, चिंचवली, शिरवली, आंबे, मौजे महालुंगी, मोबेॅ, खानाव, वाकडी, केवाळे, हरिग्राम, याग्रामीण भागातील शिवसैनिक, पदाधिकारी व जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी रामदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसंपर्क अभियान दौरा आयोजित करण्यात आला होता. 

शिवसंपर्क अभियान दौऱ्यात रामदास पाटील यांच्या समवेत भरत पाटील, शिवसेना संघटक पनवेल तालुका, दिपक निकम, शिवसेना विधानसभा संघटक, एकनाथ म्हात्रे, शिवसेना ग्रामीण तालुका प्रमुख, योगेश तांडेल,कुंभारकर शशीकांत भगत, दत्ता फडके, शिवसेना संघटक, विभाग प्रमुख, शाखाप्रमुख, शिवसैनिक, तसेच युवासैनिक शिवसंपर्क अभियानात सहभागी झाले होते.
Comments