खारघरमध्ये भगवान जगन्नाथ रथयात्रा महोत्सव सुरु.....
खारघरमध्ये भगवान जगन्नाथ रथयात्रा महोत्सव सुरु.....

पनवेल, दि.13 (वार्ताहर) ः महाराष्ट्र ओडिया वेलफेअर असोसिएशनच्या वतीने खारघर मध्ये भगवान जगन्नाथ रथयात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. 
महाराष्ट्र ओडिया वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने खारघर, सेक्टर-5 मधील जगन्नाथ मंदिरात महोत्सव सुरु आहे. कोरोना महामारीमुळे रथ यात्रास मनाई असल्यामुळे मंदिरात रथ पुजन करुन भगवान जगन्नाथ, बहीण सुभद्रा आणि मोठे भाऊ बलभद्र या तिघांच्या मूर्तीचे पुजन करण्यात आले. यावेळी दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. रथयात्रा महोत्सव मंदिरात नऊ दिवस सुरु राहणार आहे.
Comments