गुरुदक्षिणा म्हणून वनौषधी रोपे भेट ; आर्या वनौषधीचा आगळा वेगळा उपक्रम...

गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून आर्या वनौषधी संस्थेच्यावतीने गुरुजनांना गुरुदक्षिणा म्हणून दुर्मिळ वनौषधी रोपे भेट देवून एक आगळी वेगळी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.
पर्यावरणाचा समतोल व येणाऱ्या पिढीचे भविष्य लक्षात घेवून एक सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम सुधीर पाटील आणि त्यांचे सहकारी करत आहेत. त्यांचे हे आगळेवेगळे उपक्रम खरोखरच खूपच कौतुकास्पद आहेत असे मत सी.के.ठाकूर विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांनी व्यक्त केले.
यावेळी पत्रकार सुभाष  वाघपंजे, एकता आवाज फाउंडेशन चे अध्यक्ष विक्रम येलवे, पत्रकार अविनाश पाटील,दत्तू कोल्हे,आर्या वनौषधी संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील यांच्या हस्ते श्वेत मुसळी,विधारा,जंगली अद्रक, पांढरा चित्रक,लाल चित्रक,सीतेचे अशोक, लाल चंदन,कडू किराईत, गुडमार, दमवेल, पुनर्नवा,अग्निशिखा आदी दुर्मिळ रोपे गुरुजनांना भेट देण्यात आली. आर्या वनौषधी संस्थेच्या या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे नागरिकांनी कौतूक केले .

Comments