रोटरी ट्रस्टचे चेअरमन सुधीर कांडपिळे यांचा सेवापूर्ती सत्कार.....

पनवेल, दि.1 (वार्ताहर) ः रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन चॅरिटेबल ट्रस्ट संचालित रोटरी कर्णबधिर मुलांच्या विशेष शाळेत संस्थेचे चेअरमन सुधीर कांडपिळे तसेच संस्थेचे सचिव राजेंद्र ठाकरे यांचा सेवापुर्ती सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.  
यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष हर्मेश तन्ना पुढील अध्यक्ष गुरुदेवसिंग कोहली त्याचप्रमाणे चॅरिटेबल ट्रस्ट चेअरमन डॉ. जनार्दन एन. सी., नुतन सचिव सैफुद्दीन व्होरा, नुतन खजिनदार प्रमोद वालेकर तसेच कान, नाक, घसा तज्ञ डॉ. कांचन जनार्दन, रेखा कांडपिळे, शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका शैला बंदसोडे आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली.  शाळेच्या प्र. मुख्याध्यापिका शैला बंदसोडे यांनी आपले  मनोगत व्यक्त केले.  मा. चेअरमन व मा. सचिव यांच्या सहकार्याने 6 वर्षाच्या कालावधीत शाळेची झालेली प्रगती, सोईसुविधा, शीघ्र निदान व उपचार  केंद्राची स्थापना विद्यार्थ्यांसाठी ई-लर्निंग ची सुविधा, कॉम्प्युटर इ. अशा सर्व आधुनिक व तंत्रज्ञानाची सोय उपलब्ध करुन दिली.  त्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.  शाळेतील शिक्षक कर्मचारी वर्गाने आपापले मनोगत व्यक्त केले.  शाळेच्या प्र. मुख्याध्यापिका शैला बंदसोडे यांच्या हस्ते मा. चेअरमन सुधीर कांडपिळे यांचा व मा. सचिव राजेंद्र ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. शाल, श्रीफळ तसेच कोलाज फ्रेम देऊन त्यांना गौरवण्यात आले.  याप्रसंगी नवनियुक्त चेअरमन डॉ. एन.सी. जनार्दन व सचिव सैफुद्दीन व्होरा यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तु देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.  सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विशेष शिक्षिका अरुंधती बंदसोडे यांनी उत्कृष्टरित्या केले.  तसेच  स्पीच थेरपिस्ट संजय होन यांनी आपले विचार व्यक्त केले.

Comments