कारटेपची चोरी.....
पनवेल, दि. २७ (संजय कदम) ः मारुती सुझुकी वॅगेनार गाडी बसविलेला 10 हजार रुपये किंमतीचा सोनी कंपनीचा कारटेप अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना शहरातील कल्पतरु रिव्हरसाईडच्या बाहेरील कंपाऊंडच्या रस्त्यावर घडली आहे.
गौरव गोसाळकर (25) यांनी त्यांची मारुती सुझुकी वॅगेनार गाडी क्र.एमएच-01-डीपी-5175 मध्येे बसविलेला सोनी कंपनीचा कारटेप अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.