सिडकोच्या पोकलेन समोर रामशेठ ठाकूर यांनी दिला ठिय्या ; ओवळे ग्रामस्थांची आक्रमक भूमिका...

पात्र घरांच्या पुनर्वसनाबाबत निर्णय घ्या आणि मगच बुलडोजर चढवा
पनवेल / वार्ताहर :- सिडकोच्या अतिक्रमण विरोधी विभागाने आज शुक्रवार दिनांक 19 जुलै रोजी मोठा पोलिस बंदोबस्त आणि सिडकोच्या सुरक्षा रक्षकांच्या  फौज फाट्यासह बुलडोझर, पोकलेन घेऊन येत ओवळे येथे कारवाई करण्याचा प्रयत्न केला.यावेळी केंद्र सरकारच्या एका प्रकल्पासाठी केवळ रिक्त शाळेवर कारवाई करणार आहोत असे सिडको अधिकाऱ्यांचे म्हणणे होते,परंतु त्या कारवाई चे आड येथील तीन पात्र घरे देखील तोडण्याचा सिडको चा मनसुबा असल्याने ग्रामस्थांनी विरोध केला .यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी बुलडोझर समोर ठिय्या देत अतिक्रमण विरोधी पथकाला रोखून धरले. पावसाळ्यात अतिक्रमण विरोधी तोडक कारवाई न करण्याचे आदेश असताना सुद्धा अतिक्रमण विरोधी पथकाचे अधिकारी ढगे यांचे ढग ओवळे गावावर कसे काय जमले? असा प्रश्न जनमानसातून उपस्थित होत होता?
       याबाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना रामशेठ ठाकूर म्हणाले की, आज सिडको येथील प्रकल्पग्रस्तांना आश्वासनं खेरीज दुसरे काहीही देत नाही. येथील पात्र घरांना पुनर्वसनाचे बाबत कुठलीही माहिती न देता त्यांना घिसाडघाईने घराबाहेर काढणे उचित होणार नाही. आम्ही अथवा येथील कुठलाही प्रकल्पग्रस्त बांधव हा सरकारच्या प्रकल्पाच्या अजिबात विरोधात नाही हे सर्वप्रथम मी स्पष्ट करतो. परंतु राष्ट्रहितासाठी एखादा प्रकल्प निर्माण होत असेल आणि त्यासाठी आमचे बांधव जमिनी देत असतील तर त्यांना त्यांचे योग्य पुनर्वसन मूल्य प्राप्त झाले पाहिजे.
      यावेळी रामशेठ ठाकुर यांनी सिडको अस्थापानावर ठपका ठेवत सांगितले की, प्रकल्पग्रस्तांची गरज, मागण्या, आणि पुनर्वसन या करता सिडको अजिबात कार्यतत्परता दाखवत नाही, परंतु कारवाई करताना मात्र ते वायूच्या वेगाने हजर होतात. आज पावसाळ्यात देखील तोडक कारवाई होत आहे त्यामुळे नवी मुंबई विमानतळाला दिवंगत लोकनेते माजी खासदार दी बा पाटील यांचे नाव देण्यासाठी आम्ही जे आंदोलन करत आहोत त्याचा सिडको सूड तर उगवत नाही ना? असा संशय आमच्या मनात येऊ लागला आहे.
        या आंदोलनात रामशेठ ठाकूर यांच्या सह प्रकल्पग्रस्त लॉरी चालक-मालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नंदराज मुंगाजी, एडवोकेट रेश्मा अमित मुंगाजी, अमित मुंगाजि, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील, कुंडे वहाळ चे सरपंच सदाशिव वास्कर,सदस्य दत्ता पाटील,अमीर म्हात्रे आदी मान्यवरांच्या समवेत ग्रामस्थ आणि प्रकल्पग्रस्त बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

चौकट
सिडको आस्थापनाने प्रकल्प ग्रस्त बांधवांचे भावनांशी खेळणे बंद केले पाहिजे. आमचे प्रश्न, आमच्या समस्या, आणि आमच्या मागण्या प्रलंबित असताना त्यांच्याकडे जराही लक्ष न देता सिडको तोडक कारवाई करण्यासाठी मात्र एका पायावर तयार असते. सिडकोने कधीही प्रकल्पग्रस्तांच्या उत्कर्षाचा विषय गांभीर्याने घेतलेला नाही. परंतु आम्हा प्रकल्पग्रस्त बांधवांना जर का गांभीर्याने घेणार नसाल तर नजिकच्या भविष्यात आम्हाला आमची ताकद दाखवावी लागेल.   - नंदराज मुंगाजी.
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image