पनवेल दि. १४ (वार्ताहर): एका महिलेची ऑनलाईनद्वारे फोन करून ७२ हजारांची फसवणुक केल्याची घटना पनवेल शहरात घडली आहे.
सुशिला पाटील यांना एका इसमाने मोबाईल फोन करून त्यांचे सिमकार्ड व्हेरिफिकेशन करायचे आहे असे सांगून त्याकरीता मोबाईलवर टिम व्हूअर एप डाऊनलोड करावयास सांगून त्याद्वारे आरोपीने त्यांच्या एसबीआय बॅंकेतील अकाऊंटमधील 72 हजार ट्रान्सफर करून त्यांची ऑनलाईन फसवणूक केल्याची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.