सायकल चोरीसह मंगळसूत्र चोरणार्‍या सराईत गुन्हेगारास अटक........
सायकल चोरीसह मंगळसूत्र चोरणार्‍या सराईत गुन्हेगारास अटक.....
पनवेल, दि.13 (संजय कदम) ः पनवेल परिसरात गर्दीच्या ठिकाणी महिलांचे मंगळसूत्र व इतर सोन्याचे दागिने तसेच सायकली चोरणार्‍या सराईत गुन्हेगारांस पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 
शहरातील रायगड बाजार, पनवेल येथे कोणीतरी अज्ञात चोरटयाने एका महिलेच्या पर्स मधून सोन्याचे मंगळसुत्र चोरी करुन नेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसामध्ये सायकल चोरीचे प्रमाण सुद्धा वाढले होते. त्या अनुषंगाने पनवेल शहर पोलीस ठाणेचे वपोनि अजयकुमार लांडगे व पोनि (गुन्हे) संजय जोशी यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि अनिल देवळे,पोउपनिरी सुनिल तारमळे, पोहवा रविद्र राऊत, पोना परेश म्हात्रे, पोशि सुनिल गर्दनमारे, पोशि युवराज राऊत, पोशि विवेक पारासुर, पोना विनोद पाटील,पोशि यादवराव घुले, पोना पंकज पवार, पोना गणेश चौधरी, पोशि खेडकर व पोशि भगवान साळुंखे आदींच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले होते व गुप्त बातमीदाराच्या माहितीनुसार दिनेश रामदास जाधव, (35 वर्षे पनवेल) यास येथुन ताब्यात घेवुन त्याची चौकशी केली असता त्याने सोन्याचे मंगळसुत्रासह 13 चोरीच्या सायकली असा मिळून एकूण 1 लाख 5 हजार रुपये किंमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. याच्या अटकेमुळे अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. 
फोटो ः चोरीच्या हस्तगत केलेल्या सायकली
Comments