विमानतळ प्रकल्पग्रस्तांना नोकरीत प्राधान्य देण्यासाठी प्रशिक्षण केंद्र उभारण्याची सिडकोकडे मागणी...
प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना विमानतळावर उच्च पदावर नोकऱ्या द्या  - बबनदादा पाटील

पनवेल वृत्तसेवा :-  नव्याने होवू घातलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ठिकाणी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांच्या मुलांना उच्च पदावर नोकऱ्या देण्यासाठी तशा आशयाची अद्ययावत प्रशिक्षण केंद्रे उभारण्याची मागणी पनवेल उरण विधानसभेचे शिवसेनेचे मा.आ.मनोहर भोईर, शिवसेनेचे जिल्हा सल्लागार तथा स्व. दि.बा.पाटील स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष बबनदादा पाटील यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ संजय मुखर्जी यांच्याकडे केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत चंदू पाटील हे देखील उपस्थित होते. विमानतळावर होत असलेल्या कामांसह याठिकाणी उच्च पदावरील होणाऱ्या नियुक्त्यामध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना सामावून घेण्यासाठी त्यांच्या शैक्षणिक पात्रतेमध्ये वैमानिक, टेक्निकल विभागातील अद्ययावत प्रशिक्षण त्यांना मिळावे आणि त्यांना या प्रकल्पामध्ये निर्माण होणाऱ्या रोजगारांमध्ये सामावून घ्यावे यासाठी पनवेल उरण परिसरातील महत्वाच्या ठिकाणी या मुलांसाठी अद्ययावत प्रशिक्षण केंद्र उभारण्याची सुरुवात करण्याची प्रामुख्याने मागणी करण्यात आली आहे. 

स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना प्राधान्याने नोकरी द्यावी, तसेच सदर ठिकाणी होत असलेल्या विमानतळावर विविध प्रकारच्या नोकऱ्या निर्माण होणार असून प्रकल्पग्रस्त तरुणांना त्यासाठी लागणारी कार्यकुशलता शिकता यावी म्हणून अद्ययावत प्रशिक्षण केंद्र येथे उभारण्याची खऱ्या अर्थाने गरज निर्माण झाली आहे. इथल्या स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध असणे ही प्रचंड गरज असून त्यांचा तो हक्क आहे, त्यासाठी सिडकोच्या माध्यमातून तातडीने प्रशिक्षण केंद्रे उपलब्ध होणे मह्त्वाचे आहे. इथला स्थानिक भूमिपुत्र कार्यकुशल झाल्यास तो इथे भविष्यात निर्माण होणाऱ्या विमानतळ प्रकल्पामध्ये निर्माण होत असलेल्या रोजगारांसाठी सक्षम होऊ शकतो, आणि त्यामुळे त्याच्या शैक्षणिक पत्रतेत येथील प्रकल्पामध्ये काम करण्याची योग्यता निर्माण होऊ शकते. म्हणून लवकरात लवकर अद्ययावत प्रशिक्षण केंद्र उभारण्याची मागणी सिडकोकडे करण्यात आली आहे. या मागणीनुसार हे अद्ययावत प्रशिक्षण केंद्र सुरू झाल्यास येथील स्थानिक भूमिपुत्र तरुणांना त्याचा नक्कीच फायदा होईल, असे मत यावेळी बबनदादा पाटील यांनी व्यक्त केले.
Comments
Popular posts
दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान...
Image
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
Image
महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल....
Image
खांदा कॉलनी युवासेने तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....
Image
मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केला जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धेत कांस्यपदक विजेते सुभाष पुजारी यांचा विशेष सत्कार....
Image