पनवेल परिसरातील चार मोटारसायकलींची चोरी....
पनवेल परिसरातील चार मोटारसायकलींची चोरी...

पनवेल दि.१० (संजय कदम)- पनवेल परिसरातून चार मोटारसायकलींची चोरी झाली असून त्यात तीन तळोजा परिसरातून तर एक कामोठे परिसरातून चोरीस गेलेल्या आहेत.
         गंगाधर शेट्टी यांची ३० हजारांची हिरो ग्लॅमर कंपनीची काळ्या व निळ्या रंगाची मोटारसायकल क्र-एमएच 46 बीजे 3074 हि देवीचा पाडा पूनम कलेक्शन दुकानाजवळ उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. त्याचप्रमाणे विकास कांबळे यांची 15 हजारांची होडा सीबी शाईन कंपनीची काळ्या रंगाची मोटारसायकल क्र-एमएच 04 जेएल 9514 हि तळोजा औद्योगिक वसाहत डाऊ केमिकल कंपनी येथे उभी केली असता तिची चोरी झाली आहे. तर सचिन हुंबे यांची 50 हजारांची यामाहा कंपनीची एफझेड ग्रे रंगाची मोटारसायकल क्र-एमएच 46 बीजे 5146 हि बाळकृष्ण यांची चाळ देवीचा पाडा येथे उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. याबाबतची तक्रार तळोजा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. तर विभोर देठे यांची 45 हजारांची होंडा कंपनीची एक्टीव्हा 3जी ग्रे रंगाची क्र-एमएच 46 एएन 5834 हि एमजीएम हॉस्पिटल येथील पार्कींगमध्ये उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्यांनी चोरल्याने याबाबतची तक्रार कामोठे पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments
Popular posts
पनवेल शहर वाहतूक शाखेच्या तत्परतेमुळे अपघातग्रस्त तिघांना मिळाले तात्काळ उपचार...
Image
महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आमूलाग्र बदलांचे संकेत ; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश...
Image
समाजकार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल कोमल मोहनिष भोईर यांना ''टॉप 30 इन्स्पायरिंग वुमन अवॉर्ड 2026'' प्रदान...
Image
पनवेलच्या सिद्धांत संजय कांबळे विद्यार्थ्याचे स्कॉटलंड सॉलिसिटर परीक्षेत घवघवीत यश...
Image
एक महिन्याच्या डोकेदुखीचे उलगडले दुर्मिळ कारण ; शस्त्रक्रिया टाळत ‘एपिड्युरल ब्लड पॅच’ प्रक्रियेने रुग्णावर यशस्वी उपचार
Image