गांजा अंमली पदार्थ सेवन केल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई....
पनवेल दि.0८ (संजय कदम)- बेकायदेशीररित्या अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या एका इसमाविरूद्ध तळोजा पोलिसांनी कारवाई केली आहे.
तालुक्यातील तळोजा येथील शिर्के कंस्ट्रक्शन कंपनी फेस 02 च्या परिसरात असलेल्या झाडाझुडपांच्या अडोशाला जावेद खान (वय-27) हा अंमली पदार्थाचे सेवन करीत असल्याची माहिती वपोनि काशिनाथ चव्हाण यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि बाळासाहेब शिंदे, सपोनि पारासूर, पोलिस उपनिरीक्षक कुटे, पोलिस शिपाई श्रीकांत पवार आदींच्या पथकाने त्याठिकाणी छापा मारून सदर इसमाविरोधात अंमली पदार्थ विरोधी कायदा 1985चे कलम 8(क), 27 प्रमाणे कारवाई केली आहे.