मोबाईल शोरूममध्ये घरफोडीत हजारोंचा ऐवज लंपास...

पनवेल दि. ९ (वार्ताहर)- पनवेल शहरातील दोन वेगवेगळ्या मोबाईल शोरूममध्ये अज्ञात चोरट्यांनी केलेल्या घरफोडीत अनेक नामांकीत कंपनीचे मोबाईल फोन, चार्जर, पॉवरबॅंक असा मिळून जवळपास 58 हजारांचा ऐवज चोरल्याची घटना घडली आहे.           
शहरातील बेस्ट डिल मोबाईल शॉपी तसेच ए.के. मोबाईल शॉपी या मोबाईल दुकानांचे शटर कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी तोडून त्या वाटे आत दुकानात प्रवेश करून वेगवेगळ्या नामांकीत कंपनीचे मोबाईल फोन, चार्जर, पॉवरबॅंक असा मिळून जवळपास 58 हजारांचा ऐवज चोरल्याची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments