पनवेल :- मालिका, वेबसीरिज, जाहिरात क्षेत्रांत नावलौकिक मिळविलेल्या पलक राजन कडू हिचा साईमंदिर, वहाळतर्फे अरुण बुवा कारेकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. ती उरण तालुक्यातील धुतूमची रहिवासी आहे. तिचे वय अवघे अकरा वर्षांचे आहे; परंतु तिने अतिशय कमी वयात सिनेसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटविला आहे. विशेष म्हणजे ती खेळातही आपले कौशल्य दाखवत आहे. त्यामुळे धुतूमच्या या कन्येचा परिसरात नावलौकिक असून तिच्या कामगिरीची दखल अनेक ठिकाणी घेतली जात आहे.
फ्लेश- वेबसीरिज, अहिल्याबाई होळकर, विद्या, क्राईम पेट्रोल, संजीवनी आदी मालिकांत ती वेगवेगळ्या भूमिका करीत आहे. तसेच मोठमोठ्या ब्रॅंडच्या जाहिरातींतही तिने काम केले आहे. विशेष म्हणजे तिने रशियात किक बॉक्सिंगमध्ये गोल्ड मेडल मिळविले आहे. तसेच राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही खेळात नैपुण्य मिळविले आहे.
तिने नुकतेच वहाळच्या साईमंदिरात दर्शन घेतले. त्यावेळी साई देवस्थानचे संस्थापक रवींद्र पाटील तिथे उपस्थित होते. त्यांनी तातडीने तिची दखल घेऊन तिचा विशेष सत्कार करून पाठीवर कौतुकाची थाप दिली.
यावेळी मो. का. मढवी गुरुजी, माजी जिल्हा परिषद सदस्या पार्वती पाटील, पनवेल अर्बन बँकेच्या संचालिका माधुरी गोसावी, तसेच उलवा नोड रोटरीचे अध्यक्ष शिरीष कडू आणि पदाधिकारी उपस्थित होते.