ए.आय.सी.टी.ई./एम.आय.सी यांच्या तर्फे राष्ट्रीय स्तरावर टॉयकॅथान २०२१ स्पर्धा संपन्न....


पनवेल दि. ०८ (वार्ताहर)- भारतातील खेळणी उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी ए.आय.सी. टी.ई./एम.आय.सी यांच्या तर्फे राष्ट्रीय स्तरावर टॉयकॅथान २०२१ या स्पर्धेच्या अंतिम फेरी नुकतीच संपन्न होऊन याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. 
संपूर्ण स्पर्धेचे आयोजन शिक्षण मंत्रालयाच्या सहकाराने, महिला व बालविकास मंत्रालय, सूचना व प्रसारण मंत्रालय. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, लघु व माध्यम उद्योग मंत्रालय आणि वस्त्रउदयोग मंत्रालय यांच्या संयुक्त सहभागाने करण्यात आले. डिजिटल स्वरूपात पार पडलेल्या या स्पर्धांच्या अंतिम फेरीसाठी देशभरातील अनेक केंद्रांमध्ये नवीन पनवेलच्या पिल्लई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची निवड करण्यात आली या स्पर्धेचा सांगता समारंभ ऑनलाईन पार पडला. यासाठी सन्माननीय अतिथी पद पिल्लई एच.ओ.सी. कॉलेज रसायनाचे प्राचार्य डॉ. मॅथ्यु जोसेफ व मुख्य अतिथी पद मुंबई विद्यापीठाचे डॉ. उकरांडे यांनी भूषविले. पिल्लई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या अध्यापिका रुचिरा पाटोळे यांनी या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. पिल्लई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. संदीप जोशी यांच्या सुरवातीच्या निवेदना नंतर डॉ. मॅथ्यू जोसेफ व डॉ. उकरांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी पिल्लई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राध्यापक डॉ. अविनाश वैद्य यांनी सर्वांचे आभार मानले.
Comments