नगरसेवक ज्ञानेश्वर पाटील यांच्या गाडीची तोडफोड करून लाखोंचा ऐवज लंपास....

पनवेल दि. ११ (वार्ताहर)- पनवेल महानगरपालिकेचे महाविकास आघाडीचे नगरसेवक ज्ञानेश्वर पाटील यांच्या गाडीवर तिघांनी हल्ला करून त्यांच्या गाडीची तोडफोड केली आहे. तसेच गाडीत असलेली रोखरक्कम व सोन्याची चेन असा जवळपास 2,20,000 रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याची तक्रार तळोजा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
          नगरसेवक ज्ञानेश्वर पाटील हे शनिवारी रात्री 9 वाजता त्यांच्या घरी घोट गाव येथे इन्होव्हा या गाडीने जात असताना लहू निघुकर यांच्या घरासमोर त्यांची गाडी आली असता घोट गावातील तीन इसमांनी त्यांना शिवीगाळी व दमदाटी करून त्यांच्या हातातील दांडक्याने इनोव्हा गाडीच्या काचा फोडून डिक्कीत कापडी पिशवीत ठेवलेली रोखरक्कम व सोन्याचे दागिने असा ऐवज चोरीस गेल्याची तक्रार तळोजा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments