पनवेल / वार्ताहर :- पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील Covide-19 कोरोना विषाणूमुळे ज्या मुलांचे आई- वडील गमावले आहेत, अश्या मुलांच्या शिक्षणाकरिता महापालिकेमार्फत शिष्यवृत्ती देण्यात यावी अशी मागणी शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत, महानगर प्रमुख रामदास शेवाळे व विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर तसेच उपमहानगर प्रमुख दिपक घरत यांनी महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांना निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोना विषाणूमुळे ज्या मुलांचे आई-वडील त्यांनी गमावले आहेत. अश्या मुलांच्या १ ली ते १२ वी पर्यंतच्या शिक्षणा करिता रुपये ७,०००/- शिष्यवृती स्वरूपात देण्यात यावी. कारण मुळातच कोरोनामुळे गेली २ वर्षात जनतेची आर्थिक परिस्थिति खूप बिकट झाली आहे. त्यातच ज्या घरातील Covide-19 कोरोना विषाणूमुळे ज्या मुलांनी त्यांचे आईवडील गमावले आहेत, अशा मुलांसाठी ही योजना चालू करावी. तसेच अश्या प्रकारची योजना नवी मुंबई महापालिका क्षेत्रात सध्या चालू असून, त्याची दखल घेत पनवेल महानगर पालिका क्षेत्रात ही योजना चालू करण्यात यावी अशी विनंती करण्यात आली या वेळी सेनेच्या वतीने पनवेल महानगर आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.