अवैद्य अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या गुन्हेगारांना देशीबनावटीचे २ पिस्टल व २ जिवंत काडतुसांसह अटक....
पनवेल / वार्ताहर :- अवैद्य अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या गुन्हेगारांना देशीबनावटीचे दोन पिस्टल व दोन जिवंत काडतुसांसह मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखा, नवी मुंबई यांचेकडून अटक करण्यात आली आहे. 
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये बेकायदेशीर अग्निशस्त्रे व दारू गोळा बाळगणारे, खरेदी / विकी करणारे इसमांवर विशेष मोहीम राबवून कारवाई करणेबाबत मा.पोलीस आयुक्त सो. नवी मुंबई व अपर पोलीस आयुक्त डॉ.बी जी शेखर पाटील नवी मुंबई यांनी आदेशीत केल्या नुसार प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त व विनोद चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, नवी मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली नवी मुंबई आयुक्तालयामध्ये गुन्हे शाखेकडुन अवैधरीत्या अग्निशस्त्रे व दारू गोळा बाळगणारे,खरेदी/ विक्री करणारे इसमांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू आहे. 
दिनांक ११/०७/२०२१ रोजी मध्यवर्ती कक्ष , गुन्हे शाखेचे पोना / २७ ९ १ मेघनाथ पाटील यांना गोपनिय बातमीदारामार्फत बेलपाडा बसस्टॉप जवळ , खारघर , मुंबई - पनवेल हायवे रोड या ठिकाणी अंदाजे २५ ते ३० वर्षे वयाचे दोन इसम येणार असुन त्यांचे ताब्यात बेकायदेशीर अग्निशस्त्र व दारूगोळा आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यानंतर मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन.बी. कोल्हटकर यांचे मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती कक्षाचे अधिकारी / अंमलदारासह बेलपाडा बसस्टॉप , खारघर याठिकाणी सापळा लावुन इसम नामे १ ) ओमनाथ सोलानाथ योगी , वय २३ वर्षे , रा . जुईगाव , मंगेश भोपी यांची बिल्डींग , तळ मजला , कामोठे , नवी मुंबई मुळ रा . गडवाई , पो . भोजपुरा , ता . आसिन्द , जि . भिलवाडा , राजस्थान. २ ) नंदलाल मेवालाल गुर्जर , वय ३० वर्षे , रा . ए –२ , रूम नं . २३७ , तळ मजला , सेक्टर २० , तुर्भे , नवी मुंबई मुळ रा . गडवाई , पो . भोजपुरा , ता . आसिन्द , जि . भिलवाडा , राजस्थान यांना ताब्यात घेतले.त्यांच्या अंगझडती मध्ये ०२ देशी बनावटीचे पिस्टल , ०२ जिवंत काडतुसे व मोबाईल फोन इ . एकूण १,०३,८०० रु. किंमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने त्यांचेविरूध्द खारघर पोलीस ठाणे गु.र.नं. २५६/२०२१ भारतीय हत्यार कायदा कलम ३,२५ सह म.पो.का.कलम ३७ ( १ ) , १३५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन त्यांना दिनांक ११/०७/२०२० रोजी अटक करण्यात आलेली असुन दि . १४/०७/२१ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी आहे. 
आरोपी यांचेकडे अग्निशस्त्रे मिळुन आल्याने त्यांचा बेकायदेशीर शस्त्रे बाळगण्याबाबतचा नेमका काय उद्देश होता. तसेच ते अग्निशस्त्रे कोठून आणले याबाबत सखोल तपास मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखा,नवी मुंबई यांचेकडुन सुरू आहे. सदरची उल्लेखनीय कामगिरी मध्यवर्ती कक्ष , गुन्हे शाखा, नवी मुंबईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक , एन.बी.कोल्हटकर , पोउपनि . प्रशांत ठाकुर, अमलदार मेघनाथ पाटील, नितीन जगताप , विष्णु पवार , सचिन टिके , सतिश चव्हाण , यांनी केलेली आहे . 
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image