मेट्रोपोलिस पॅथोलॉजी व अमूल आईस्क्रीम पार्लरमध्ये घरफोडी..
मेट्रोपोलिस पॅथोलॉजी व अमूल आईस्क्रीम पार्लरमध्ये घरफोडी

पनवेल दि. २६ (संजय कदम): तळोजा फेज-01 येथील मेट्रोपोलिस पॅथोलॉजी शॉप नं.-3 व अमूल आईस्क्रिम पार्लप शॉप नं-1 बालाजी हाईट्स हि दुकाने बंद असताना अज्ञात चोरट्यांनी केलेल्या घरफोडीत रोखरक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे.
              सदर दुकाने बंद असल्याचे पाहून लोखंडी शटरचे कुलूप कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करून दोन्ही दुकानात मिळून 10,790 रूपये रोखरक्कम लंपास केली आहे. याबाबतची तक्रार तळोजा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments