सव्वा लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त ; स्विफ्ट कारमधुन गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक ...


पनवेल (वार्ताहर): सायन-पनवेल मार्गावरील तळोजा फाटा येथे स्विफ्ट कार घेऊन गांजा हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना कळंबोली पोलिसांनी अटक केली आहे. विजय मधुकर श्रीरामे (39) व मिलिंद बाळू कावरे (33) अशी या दोघांची नावे असून पोलिसांनी त्यांच्याजवळ असलेला सुमारे सव्वा लाख रुपये किंमतीचा 10 किलो 600 ग्रॅम वजनाचा गांजा व 4 लाख रुपये किंमतीची स्विफ्ट कार जफ्त केली आहे.  
सायन-पनवेल मार्गावरील पुरुषार्थ पेट्रोल पंपाजवळ दोन व्यक्ती कुर्डवाडी येथून स्विफ्ट कारने सोमवारी पहाटेच्या सुमारास गांजा या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती कळंबोली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक राणी काळे व त्यांच्या पथकाने रविवारी मध्यरात्री पासून पुरुषार्थ पेट्रोल पंपाजवळ सापळा लावला होता. त्यानंतर पहाटे पावणे चार वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणी आलेल्या एका पांढऱया रंगाच्या स्विफ्ट कारमधुन दोन व्यक्ती उतरुन संशयास्पदरित्या उभे राहिले असता, त्या भागात दबा धरुन बसलेल्या पोलिसांच्या पथकाने दोघांची धरपकड केली.  
त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासणीत विजय श्रीरामे याच्याजवळ असलेल्या गोणीमध्ये सुटा हिरवट पाने, फळे,फुले, काडÎा, बिया असा सलंग्न असलेला ओसलर उग्र वासाचा 10 किलो 600 ग्रॅम वजनाचा गांजा आढळुन आला. त्यामुळे पोलिसांनी विजय आणि मिलिंद या दोघांना एनडीपीएस कलमाखाली अटक करुन स्विफ्ट कारसह 5 लाख 28 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जफ्त केला.
Comments