पनवेल :- 18 जुलै रविवार सकाळी ठीक 11 वाजता जाणीव सामाजिक संस्था आणि टेंभोडे ग्रामस्थ यांच्या वतीने गावात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.
भरपावसात 200 च्या आसपास लोकांनी वृक्षारोपण केले सर्व बांधवांनी कोरोनाचे नियम पाळून वृक्षारोपण केले किंबहुना या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यानी कोविड वॅक्सिन घेऊनचं सहभागी होण्याची विनंती राजेश केणी यांनी केली होती.जाणीवच्या सहकाऱ्यासोबत टेंभोडे गावातील तरुण मंडळी मोठ्या संख्येत सहभागी होती
यावेळेस आंबा, पेरू, चिंच, चिकू, काजू, वड, पिंपळ आदी झाडे लावण्यात आली, निसर्ग समतोल राहण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त वृक्षारोपण होणं गरजेचं आहे असं राजेश केणी यांनी सांगितले.
पत्रकारांशी बोलताना जाणीव च्या जुन्या उपक्रमाची माहिती राजेश केणी यांनी सांगितली.
टेंभोडे चे सुपुत्र ऍड विजय गडगे यांनी जाणीव च्या वतीने गावात वृक्षारोपण व्हावे म्हणून जाणीव फौंडेशन ला संपर्क केला होता.
टेंभोडेचे मा सरपंच आणि प्राचार्य मोहन पाटील यांनी आपल्या मनोगतात जाणीव फौंडेशन चे कौतुक केले आणि पुढील काळात देखील हे कार्य असेच सुरू राहावे म्हणून शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास जाणीव चे अध्यक्ष राजेश केणी, सामाजिक कार्यकर्ते मा जि प सदस्य प्रकाशजी म्हात्रे, खजिनदार संदीप यादव, ऍड विजय गडगे, प्राचार्य आणि मा सरपंच मोहन पाटील,आळवे, घोडके, राम चातुफळे, सुभाष भोपी,अनिल उलवेकर, दीपक पाटील, सोमटने ग्रा प सदस्य सुशांत पाटील, वानखेडे, महेश मंडलिक, किरण जाधव, संतोष यादव, पत्रकार मंदार दोंदे, पत्रकार विवेक पाटील, पत्रकार जगधने, पत्रकार संजय कदम आणि टेंभोडे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते