मुख्यमंत्र्यांच्या आवाहनास प्रतिसाद देत खांदा कॉलनी शिवसेना शाखेतर्फे पूरग्रस्तांना सर्वोतोपरी मदत...पनवेल वैभव / प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री,शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तमाम शिवसैनिकांना पूरग्रस्त भागातील नागरिकांना योग्य ती मदत करा असे आवाहन केले होते या आवाहणास प्रतिसाद देत चिपळूण , महाड - कोकण वासीयांसाठी मदतीसाठी खारीचा वाटा म्हणून शिवसेना खांदा कॉलनी शहरतर्फे अत्यावश्यक वस्तूंचे साहित्य घेऊन दिनांक २८ व २९ जुलै २०२१ रोजी चिपळूण व महाड येथील पूरग्रस्त गावात मदतीसाठी पोहोचले. 

यावेळी खांदा कॉलनी शहर प्रमुख सदानंद शिर्के यांच्या सोबत कर्तव्य पार पाडण्यासाठी सहभागी झालेले लढवय्ये शिवसैनिक - उपशहर प्रमुख दत्तात्रय महामुलकर, शहर संघटक संतोष जाधव, उपशहर संघटक संजीव गमरे,कार्यालय प्रमुख संदीप तोरणे(सर),उपकार्यालय प्रमुख नागम सर ,शाखाप्रमुख जयवंत भायदे, युवा सेना पनवेल उपविधानसभा अधिकारी सुशांत सावंत, उपशहर अधिकारी प्रतीक कारंडे, खांदा कॉलनी चिटणीस सुयश बंडगर, खांदा कॉलनी विभाग अधिकारी आभेश ओंबळे, शाखा अधिकारी सौरभ महामुलकर, ऋषिकेश घुले, युवासैनिक युगेश कुरणेआदी शिवसैनिक उपस्थित होते त्यांचे आणि मदत देणा-यांचे व जमा करणा-यांचे व या मोहिमेत हात भार लावणाऱ्या सर्वांचे खूप खूप  आभार व धन्यवाद खांदा कॉलनी शहर शाखेतर्फे व शहर प्रमुख सदानंद शिर्के यांनी मानले.
Comments