शिवसेनेचे विभाग प्रमुख जयंत भगत यांची खांदा काँलनी रिअल ईस्टेट वेल्फेअर असोशिएशनच्या अध्यक्षपदी निवड...

पनवेल दि.22 (वार्ताहर)- खांदा वसाहत येथील शिवसेना विभागप्रमुख जयंत भगत यांची खांदा काँलनी रिअल ईस्टेट वेल्फेअर असोशिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
            खांदा कॉलनी रोज बाजार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व शिवसेनेचे विभाग प्रमुख जयंत भगत याची खांदा कॉलनी रिअल ईस्टेट वेल्फेअर असोशिएशनच्या अध्यक्षपदी बहुमताने निवड झाल्याबद्दल शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करून त्यांना पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
        
Comments