आर्या वनौषधी तर्फे डॉक्टररुपी देवदूतांचा गौरव..

पनवेल / वार्ताहर :-  डॉक्टर्स डे चे औचित्य साधून आर्या वनौषधी संस्थे तर्फे डॉक्टर रुपी देवदूतांना वनौषधी रोपं व सन्मानपत्रे देवून गौरविण्यात आले.
आर्या वनौषधींच्या या कार्यक्रमास  एकता आवाज फाउंडेशनचे अध्यक्ष  विक्रम येलवे,आर्या पाटील,पत्रकार दत्तू कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी मान्यवरांच्या हस्ते कोरोना काळात रूग्णांसाठी देवदूत ठरलेल्या डॉक्टरांना केवडा, निरब्राम्ही,चिरायता,वेखंड आदी वनौषधी रोपं व सन्मानपत्रे देण्यात आली.
 कोरोना काळात डॉक्टरांना देवाचं रूप मानलं गेलं .अनेक रुग्णांसाठी तर डॉक्टर हा त्यांच्या आयुष्यात आलेला देवदूत वाटला.कोरोना काळात या देवदूतांनी आपला जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केली.अशा या डॉक्टर रुपी देवदूतांच्या ऋणातून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता असे संस्थेचे अध्यक्ष व आर्या प्रहरचे संपादक सुधीर पाटील यांनी या वेळी सांगितले.
Comments
Popular posts
दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान...
Image
महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल....
Image
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
Image
खांदा कॉलनी युवासेने तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....
Image
शिवसेनेच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन खारघर मधील शेकडो महिला व पुरुषांचा सेनेत जाहीर पक्ष प्रवेश ....
Image