पनवेल गुन्हे शाखा कक्ष २ कडून एकाच वेळी दोन ठिकाणी छापा टाकून दोन गावठी दारूच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त ...

पनवेल, दि. १५ (संजय कदम) ः  पनवेल गुन्हे शाखा कक्ष 2 ने एकाच वेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून दोन गावठी दारुच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त करून दोघांना ताब्यात घेतले आहे.
पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंग, अप्पर पोलीस आयुक्त  (गुन्हे) डॉ. शेखर पाटील,  पोलीस उप आयुक्त (गुन्हे) प्रविन पाटील  यांनी अवैधरित्या हातभट्टीवर गावठी दारू तयार करून विक्री करणार्‍या इसमांवर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) विनोद चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली आदेशाप्रमाणे कार्यवाही करत असताना पनवेल् गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक गिरीधर गोरे यांनी  स.पो.नि गणेश कराड, पो.उप.नी मानसिंग पाटील, वैभव रोंगे स.पो.उप.नी साळुंखें, पो.ह.प्रशांत काटकर, अनिल पाटील, वाघ, रुपेश पाटील, इंद्रजित कानू, प्रफूल मोरे, सचिन पवार, प्रवीण भोपी, संजय पाटील, आदिनाथ फुंदे, सुनील कुडले, निलेश पाटील, सूर्यवंशी, दीपक डोंगरे, यांची दोन पथके तयार करून ऐकाच वेळी बंबावीपाडा झोपडपट्टी,कुंडे वहाळ, ता. पनवेल व दिघोदे येथे  अवैधरित्या हातभट्टी वर गावठी दारू तयार करून विक्री करत असल्याबाबत मिळालेल्या  माहिती वरून ऐकाच वेळी दोन्ही ठिकाणी छापा टाकून आरोपी इसम राजू व्यंकया नायक, वय 30 वर्षे,  रा.  बंबावीपाडा झोपडपट्टी, कुंडेवहाळ, ता. पनवेल व अंनत मोतीराम पाटील रा. ठी.दिघाटी ता.पनवेल  यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्या कब्जात मिळून आलेली गावठी दारू व   गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे गुळमिश्रित आंबवलेले मिश्रण मिळून आले. त्यापैकी गुळमिश्रित आंबवलेले मिश्रण व भट्टी जागीच नष्ट करण्यात आले असून सदर आरोपी इसमावर मुंबई दारूबंदी अधिनियमान्वये पनवेल शहर व  पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे स्वतंत्र  गुन्हें दाखल केले आहेत.
Comments