मोटार सायकलची चोरी.....
पनवेल, दि.७ (संजय कदम) ः राहत्या बिल्डींगच्या बाजूला उभी करून ठेवलेली मोटार सायकल चोरुन नेल्याची घटना पनवेल शहरात घडली आहे.
सागर पवार याने श्रद्धा स्नेह अपार्टमेंट उरण नाका पनवेल येथे बजाज कंपनीची निळ्या रंगाची पल्सर मोटार सायकल जिची किंमत 15 हजार रुपये इतकी आहे ही उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने सदर मोटार सायकल चोरुन नेल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.