गांजा या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोघांना तळोजा पोलिसांनी केले गजाआड; 3 लाखांचा ऐवज हस्तगत....

पनवेल दि. २३ (संजय कदम)- गांजा या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघा जणांना तळोजा पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून जवळपास 3 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
          तळोजा पोलिस ठाण्याचे वपोनि काशिनाथ चव्हाण यांना खास बातमीदाराकडून माहिती मिळाली की, तोंडरे गावातील आझाद ढाबा परिसरात दोन इसम बेकायदेशीररित्या गांजा हा अंमली पदार्थ आणून त्याची विक्री करण्याच्या उद्देशाने जमणार आहेत. त्यानुसार सपोनि विजय पवार, विनया पारासूर, गणपत परचाके, पोशि अनिल जाधव व पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून अमित आझाद सिंग उर्फ रोहित (वय-30) व छोटेलाल गिरलाल पाल (वय-35) या दोघांना ताब्यात घेऊन त्याच्याकडून रोखरकमेसह गांजा हा अंमली पदार्थ असा मिळून जवळपास 3 लाख 900 रूपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.
Comments