पनवेल / वार्ताहर - : तळोजा येथे दोन कारच्या अपघातानंतर हॉकी स्टिकने मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकारानंतर अमेझ होंडा कार मधील चालक पळून गेला आहे. त्याच्या विरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळोजा फेस वन येथील मोहम्मद शेख हे त्यांच्या गाडीची सर्विसिंग करून खारघर येथे आले होते. ते खारघर येथून तळोजा फेज वन येथील घरी जात असताना भुयारी मार्गाजवळ वळण घेत असताना डाव्या बाजूने आलेल्या होंडा अमेझ कारची ठोकर त्यांच्या कारला बसली. यावेळी त्या दोन्ही कार चालका मध्ये बाचाबाची झाली. होंडा कार मधील चालकाने हॉकी स्टिक काढून मोहम्मद यांना मारहाण केली व शिवीगाळ केली. या मारहाणीत गाडीची काच फुटली आहे.