अज्ञात वाहनाच्या धडकेने इसमाचा मृत्यू....
पनवेल दि. २३ (संजय कदम):अज्ञात वाहनाच्या धडकेने एका इसमाचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना पनवेल जवळील पुणे-मुंबई एक्सप्रेस महामार्गावर घडली असून या प्रकरणी पनवेल तालुका पोलिसांचे पथक अज्ञात वाहन तसेच मयत इसमाच्या नातेवाईकांचा शोध करीत आहेत.
सदर इसम हापुणे-मुंबई एक्सप्रेस महामार्गावरून पुणे बाजूस किमी 12.600 येथून पायी जात असताना त्यास कोणत्यातरी अज्ञात वाहनाच्या चालकाने जोरदार धडक देऊन त्याच्या मृत्युस कारणीभूत ठरून तो आपल्या वाहनासह निघून गेला आहे. या अपघातासंदर्भात कोणास अधिक माहिती असल्यास पनवेल तालुका पोलिस ठाणे किंवा पोलिस उपनिरीक्षक आकाश पवार भ्रमणध्वनी- 9270453314 येथे संपर्क साधावा.