पनवेल तालुका पोलीस पाटील यांनी भारतीय संविधानाची प्रत देऊन सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनवणे यांची घेतली सदिच्छा भेट...
पनवेल / वार्ताहर :- पनवेल परिमंडळ २ चे  सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनावणे यांनी सहाय्यक पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्विकारले असता पनवेल तालुक्यातील पोलीस पाटील यांनी भारतीय संविधानाची प्रत देऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली.
गावागावात कायदा व सुव्यवस्थेचे काटेकोरपणे कसे पालन करावे व कोरोनाकाळात गावकऱ्यांना लसीकरणा बाबत जनजागृती करावी , आपल्याला गावपातळीवर  काम करत असताना  होणाऱ्या अडचणीत पोलीस प्रशासन पोलीस पाटील यांच्या सोबत आहेत. याप्रसंगी चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी मिलिंद पोपेटा  (अध्यक्ष-  पनवेल तालुका पोलीस पाटील संघ, शिवकर,पोलीस पाटील  )
 कुणाल लोंढे (सचिव- पनवेल तालुका पोलीस पाटील संघ , करंजाडे पोलीस पाटील) प्रमोद नाईक (खजिनदार- पनवेल तालुका पोलीस पाटील संघ,डुंगी पोलीस पाटील) विजय खुटले ( नांदगाव पोलीस पाटील) आदी उपस्थित होते.
Comments