पिशवीमध्ये ठेवलेल्या रोख रकमेसह दागिन्यांची चोरी.....
पिशवीमध्ये ठेवलेल्या रोख रकमेसह दागिन्यांची चोरी

पनवेल, दि.१९ (संजय कदम) ः पिशवीमध्ये ठेवलेल्या रोख रकमेसह दागिन्यांची चोरी केल्याची घटना पनवेल शहरात घडली आहे.
सौ.शर्वरी भुवड (29) या त्यांच्याकडे असलेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने व इतर वस्तू यांच्या मुद्देमालाची पर्स पिशवीत घेवून रायगड बाजार पनवेल येथे खरेदी करण्यासाठी गेल्या असताना कुणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या पिशवीमध्ये ठेवलेली पर्स काढून घेवून त्यातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा मिळून जवळपास 36 हजार 500 किंमतीचा ऐवज लबाडीच्या इराद्याने चोरुन नेल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments