टायर फुटून झालेल्या अपघातात तिघे जखमी...

पनवेल दि.09 (वार्ताहर)- पनवेल जवळ एका वाहनाचेटायर फुटून झालेल्या अपघातात गाडीतील तिघे जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.        
आज सकाळी 09 .10 वाजता चे सुमारास पनवेल जवळील पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मुंबई लेनवर कि.मी.13. 200 येथे कार क्रमांक MH 02CB- 6095  या गाडीचा पाठीमागील डाव्या बाजूचा टायर फुटून गाडी पलटी होऊन अपघात झाला सदर अपघातामध्ये कनक पंच आलिया (वय-37) राहणार परेल मुंबई, स्वाती (वय-35), अनु (वय-34) हे किरकोळ जखमी झाल्याने त्यांना पनवेल तालुका पोलिसांच्या पथकाने व वाहतूक शाखेच्या पथकाने आय आर बी ऍम्ब्युलन्स ने कामोठे एमजीएम येथे रवाना केले व अपघातग्रस्त वाहन आय आर बी क्रेनच्या साह्याने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.         


फोटोः अपघातग्रस्त वाहन
Comments