पनवेल / वार्ताहर :/ श्री शिवसह्याद्री संस्था आयोजित श्री शिवराज्याभिषेक सोहळा पनवेल मध्ये उत्साहाने साजरा करण्यात आला.या वेळी शासनाने पारित केलेल्या कोविड नियमांचे पालन करत हा कार्यक्रम पार पडला.
अतिशय सध्या पद्धतीने कार्यक्रम असून मोजक्याच पदाधिकारी आणि सदस्यांच्या उपस्थितीने आणि महाराजांच्या जय घोषाने परिसर दणाणून गेला.अतिशय प्रेमपूर्वक या सोहळ्याची सांगता करत एकतेचा संदेश देण्यात आला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष सागर मुंढे, तालुका अध्यक्ष हनुमान वायभासे, संस्था सेक्रेटरी नरेंद्र चाचड, विशेष कार्यकारी अधिकारी निशांत म्हात्रे, रमेश चव्हाण ,विशाल धायजे, श्री शिव सह्याद्री संस्था ढोल पथक प्रमुख समीर जाधव, निशांत मांडवकर, अभिजित कोकरे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान पनवेल विभागाचे अक्षय मिसाळ, संकेत भोसले, सुरज गायकवाड, राजे शिवराय प्रतिष्ठान, व राजे प्रतिष्ठानचे सतीश हातमोडे व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ सन्मानीय व तरुण सहभागी झाले होते.