ग्रुप ग्रामपंचायत आदई परिसरातील रस्त्यासह हायमास्ट दिव्यांचे करण्यात आले उद्घाटन...
पनवेल दि.३० (वार्ताहर): तालुक्यातीलग्रुप ग्रामपंचायत आदई कार्यक्षेत्रातील नव्याने बांधण्यात आलेल्या कॉंक्रीटीकरण रस्त्याचे तसेच हायमास्ट दिव्यांचे उद्घाटन आज करण्यात आले.         आदई येथील ग्रामपंचायतीमार्फत तयार करण्यात आलेल्या सेंट जॉर्ज स्कूल ते आदई रिक्षा स्टॅंडपर्यंतच्या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण केेलेल्या मुख्य रस्त्याचे उद्घाटन त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या मार्फत मोजे आदई येथील रिक्षा नाका येथे बसविण्यात आलेल्याहायमास्ट दिव्यांचे उद्घाटन आज सरपंच रमाकांत गरूडे, उपसरपंच योगेश पाटील, सदस्य विलास शेळके, आकाश मोकल, प्रदिप कांबळे, सौ. सुगंधा पाटील, सौ. प्रियांका भंडारी, सौ. वर्षा शेळके या सदस्यांसह ग्रामविकास अधिकारी सुदिन पाटील, मा.ग्रा.पा.उ.व.स्व.स. आदई एकनाथ मोकल, अनंता पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष महादू पाटील, मा. उपसरपंच जनार्दन शेळके, भाई रामा पाटील, माजी सरपंच प्रभाकर शेळके, दिपक काकडे यांच्यासह ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे.
Comments