हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त; गुन्हा दाखल
हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त; गुन्हा दाखल
 
नवीन पनवेल : आदई ग्रामपंचायतीच्या पुढे मोकळ्या जागेत गुटखा विक्री करणाऱ्या इसमाला खांदेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून हजारो रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.
      
आदई गाव ग्रामपंचायतीच्या पुढे मराठी शाळेच्या बाजूला मोकळ्या जागेत सुमित जोशी (वय 35) हा इसम बेकायदेशीरपणे प्रतिबंधित असा गुटखा, पान मसाला, तंबाखू या पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार या ठिकाणी छापा टाकला असता एक इसम हातात पांढऱ्या रंगांची प्लास्टिक गोणी घेऊन बसलेला दिसला. पोलिसांनी सुमित जोशी याला ताब्यात घेतले व त्याच्याकडून हजारो रुपये किमतीचा गुटखा, पान मसाला जप्त केला. 
Comments