पांडवकडा येथे मनाई असताना डोहात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू....
पनवेल / वार्ताहर :- काल दि. 22/06/2021 रोजी खारघर पोलीस ठाणे हद्दीत पांडवकडा येथे मानखुर्द गोवंडी येथील शालेय मित्र गौरव लोखंडे, अखीप खान, सुरज यादव, मौसम घरती, राहील खान असे पांडवकडा येथे काल दिनांक 22/6/2021 रोजी संध्याकाळी 03-30 वाजेच्या सुमारास आले. त्यात गौरव लोखंडे व राहिल खान तसेच मौसम घरती यांनी डोहामध्ये उड्या मारल्या त्यात गौरव व राहील असे वर येऊन मौसम घरती हा वर आला नाही तेव्हा त्यांनी नवी मुंबई कंट्रोलला कळविले. फायर ब्रिगेड व खारघर पोलिस यांनी पाण्यात गळ टाकून तसेच प्रत्यक्ष स्वीमर पाठवून त्याचा शोध घेतला परंतु रात्री बॉडी मिळून आली नाही. आज सकाळी 9:30 वाजेच्या सुमारास फायर ब्रिगेड कर्मचाऱ्यांनी सदर डोहातील खडका खाली अडकलेले प्रेत बाहेर काढले मयताचे नाव - मौसम रामबहादुर घर्ती वय 18 वर्षे राहणार - मानको मेडिकल जवळ, गोवंडी पश्चिम, मुंबई त्याचे नातेवाईक व इतरांना माहिती दिली असून प्रेत पोस्टमार्टम कामी पाठवण्यात आलेले आहे.

खारघर पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी पावसाळा सुरू होताच आपले चॅनेल तसेच पेपरच्या माध्यमातून पाडंवकडा येथे जाऊन नये तेथे मृत्यु होवु शकतो म्हणून आवाहन केले होते तरी लोक कुठुनही डोंगरातून पायवाटेने डोगंरातील धबधब्यात जातात व जीवनास मुकतात. 
तरी पुन्हा वरीष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी खारघर डोंगरात जाऊ नये  म्हणून जनतेस आवाहन केले आहे.
Comments