पनवेल / वार्ताहर :- दिनांक २४ जून २०२१ रोजी विमानतळाच्या नामकरण्याच्या मागणीकरिता सिडको भवन येथे मोर्चा काढण्यात आला होता सदर मोर्चा मध्ये काही आंदोलकाकडून शिवसेना प्रमुख हिंदूहृदय सम्राट सन्मानिय बाळासाहेब ठाकरे व शिवसेना पक्ष प्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिवीगाळ करून माणुसकिला काळिमा फासेल अश्या प्रकारची शिवीगाळ केली असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत त्या प्रकरणी शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत व शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांनी नवी मुंबई पोलिस आयुक्त यांच्या कडे संबधितावर फौजदारी कारवाई करण्याबाबत निवेदन दिले. यावेळी सोबत शिवसेना पनवेल उपमहानगर प्रमुख दिपक घरत उपस्थित होते.
नवीमुंबई विमानतळ आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अपशब्द वापरणाऱ्यांवर कारवाईची मागणी.....