ए.टी.एम. मधून रोख रक्कम लंपास.....
ए.टी.एम.मधून रोख रक्कम केली लंपास.....

पनवेल दि. २७ (संजय कदम): अनोळखी इसमाने एटीएम मशीनमधून तक्रारदाराचे एटीएम कार्ड काढून सदर एटीएम कार्ड दुसऱ्या एटीएममध्ये वापरून 24 हजार काढून घेतल्याची घटना तळोजा औद्योगिक वसाहतीमधील एटीएममध्ये घडली आहे.
         रवीराम उर्फ रवीकुमार भोलानाथ वर्मा यांनी तळोजा औद्योगिक वसाहतीमधील एचडीएफसी बॅंक मशीनमध्ये त्यांची शिल्ल्क रक्कम पडताळणी करीत असताना मागे उभ्या असलेल्या अनोळखी इसमाने एटीएम मशीनमधून त्यांचे एटीएम कार्ड काढून सदर एटीएम कार्ड दुसऱ्या एटीएममध्ये वापरून 24 हजार काढून घेऊन तो पसार झाला आहे. याबाबतची तक्रार तळोजा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments