पनवेल :- जागतिक पर्यावरणदिनानिमित्त दिशा महिला मंचने पर्यावरण जनजागृती अभियान कळंबोली टोल नाका येथे आयोजित केले होते, आज आपण पाहात आहोत पर्यावरण संवर्धन करण किती गरजेच आहे .ऊन ,वारा, पाऊस, वादळ, अशी काही नैसगिक आपत्ती आली की आपण पर्यावरणाला दोष देतो पण आपण पर्यावरणाला दिलेला त्रास आपण पाहत नाही त्याचीच शिक्षा म्हणून की काय आज हा मानवजातीला कोरोनाचा त्रास असावा फुकट मिळणाऱ्या ऑक्सिजनची आता भरमसाठ किंमत मोजावी लागत आहे पर्यावरणविषयी जनजागृती व्हावी त्या फुकट ऑक्सिजन देणाऱ्या झाडांची लागवड व्हावी व संवर्धनही व्हावे जनजागृती व्हावी याउद्देशाने हा उपक्रम आयोजित केला होता तसेच कळंबोली पोलीस स्टेशन व कामोठे आरोग्यविभाग येथे झाडेही लावण्यात आली.
कोविडच्या सर्व नियमांचे पालन करून हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला दिशा व्यासपीठाच्या संस्थापक निलम आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्या मोहिते-उपाध्यक्ष, खुशी सावर्डेकर -सेक्रेटरी, रेखा ठाकूर-कमिटी सदस्य ,निवेदिता निखारे, दीपा खरात, अपर्णा कांबळे, रुपाली बरेटो, शिल्पा चौधरी, संगीता कदम,
अनिता मागडे ,रीना पवार ,प्रिती सचदेव, शमिका जाधव, शर्मिला मलनगावे, ज्योती खैरे दिशा व्यासपीठाच्या हिरकणी व जयदादा युवा मंचचे सदस्य मयांक सिंग, किशन, मिश्रा, तेजस खाडे ,मनमीत सिंग यांनी सहभाग नोंदवला होता, तसेच उद्योजक आणि समाजसेवक गजानन साळुंखे व जयदादा युवा मंचचे संस्थापक जयकुमार डिगोळे यांच्या सहकार्याने हा उपक्रम पार पडला.