योग दिनाच्या पूवसंध्येला साकार अकॅडमीचे उद्घाटन; योग साधना हि काळाची गरज - सरपंच रामेश्वर आंग्रे.....
पनवेल,(प्रतिनिधी) -- भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यांमध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. अगदी प्राचीन काळापासून ऋषीमुनी, साधुसंत यांनी वेळोवेळी योगाचे महत्त्व, त्याचे फायदे आणि त्याची गरज पटवून दिलेली आहे. यामुळे योग साधना हि काळाची गरज आहे. जागतिक योग दिनाच्या पूर्वसंध्येला करंजाडे वसाहतीमध्ये सेक्टर येथील साकार अकॅडमीचे उद्घाटन रविवारी ता. 20 रोजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्या हस्ते करण्यात आले. 
यावेळी सरपंच रामेश्वर आंग्रे, व्यवस्थापक डायरेक्टर हार्दिक गोकाणी, जयंत दिप्ते, पल्लवी आंबटकर, प्रदीप पांचाळ, दीपक पाटील, यांच्या उपस्तित होते.
आजच्या काळातील धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तर तंदरुस्त ठेवू शकतो; शिवाय मनावरही चांगले संस्कार करू शकतो. तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग, असे म्हणता येईल. भारतातील ही योग संस्कृती जागतिक पातळीवर बहुतांश देशांनी स्वीकारली असून, योगासनांचे लाभ त्यांनीही मोठ्या प्रमाणावर अनुभवले आहेत. जगभरातील देशांनी केवळ योग स्वीकारला नाही, तर त्याचा प्रचार आणि प्रसारही केला. आताच्या घडीला संपूर्ण जगावर करोनाचे सावट असताना योग दिनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शक्य असलेल्या प्रत्येकाने योगाचा अंतर्भाव आपल्या दैनंदिन जीवनात नक्कीच करावा, असे आवाहन करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच रामेश्वर आंग्रे यांनी केले आहे. करंजाडे वसाहतीतील सेक्टर 3 येथे साकार अकॅडमी सुरुवात करण्यात आली आहे. याचे उद्घाटन करण्यात आले. त्याचबरोबर भारतीय धर्म संस्कृतीमधील 'योग' संकल्पनेची मांडणी श्रीमद्भगवद्गीता ग्रंथात केलेली आहे. त्याच जोडीने भगवान पतंजली मुनी यांनी आपल्या योगसूत्राद्वारे मानवाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासाची संकल्पना असल्याचे मत यावेळी डायरेक्टर हार्दिक गोकानी यांनी व्यक्त केले. या अकॅडमीमध्ये योगा, डान्स, झुंबा, कराटे, स्विमिंग असे याठिकाणी शिकविण्यात येत असल्याचे गोकाणी यांनी संगितले. तसेच जीएसटी विभागाचे वरिष्ठ अधिकारी जयंत दिप्ते यांनी या अकॅडमीला शुभेच्छा दिल्या.
Comments
Popular posts
बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड प्रत्यके शिवसैनिकांनी घराघरात जाऊन केला पाहिजे- पुणे संपर्क प्रमुख व आ.सचिन अहिर
Image
पर्यावरण पूरक गणेश उत्सव ; हाच खरा गणेश उत्सव - सुप्रसिद्ध डॉ.गिरीश गुणे
Image
पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारिणी जाहीर ; महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष महेबूब शेख यांची प्रमुख उपस्थिती
Image
रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलतर्फे "सेवाश्री" पुरस्काराने प्रितम म्हात्रे सन्मानित..
Image
केदार भगत मित्र परिवार यांच्या "गणपती आरती संग्रह पुस्तकाचे मा.खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याहस्ते प्रकाशन...
Image