९५ हजाराची लाच स्वीकारताना लोकसेवकासह दिवाबत्ती व पाणी पुरवठा कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात.....


पनवेल, दि.२१ (वार्ताहर) ः तक्रारदार याच्या घराचे घरपट्टी व अ‍ॅसेसमेंट उतारे देण्यासाठी लोकसेवकाने त्यांच्याकडे एक लाखाच्या लाचेची मागणी करून तडजोडी अंती रुपये ९५ हजार आज दुपारी स्वीकारताना त्यांच्यासह दिवाबत्ती व पाणी पुरवठा कर्मचार्‍याला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नवी मुंबईने सापळा रचून पनवेल एस.टी.स्टॅण्ड परिसरातून ताब्यात घेतले आहे.
पनवेल जवळील वडघर ग्रामपंचायत येथे ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत असणारे लोकसेवक दगडू देवरे (54 ग्रामविकास अधिकारी, वडघर) यांनी तक्रारदाराकडे एक लाख रुपयाच्या लाचेची मागणी घराची घरपट्टी व अ‍ॅसेसमेंट उतारे देण्यासाठी केली होती. या संदर्भात सदर तक्रारदाराने अ‍ॅन्टी करप्शन पथक नवी मुंबई यांच्याकडे तक्रार केल्यानंतर आज दुपारी पनवेल एस.टी.स्टॅण्डच्या मागे इच्छापूर्ती गणेश मंदिरासमोरील रस्त्यावर ब्रिजा गाडीमध्ये ते व त्यांच्यासह सदर ठिकाणी दिवाबत्ती व पाणी पुरवठा कर्मचारी प्रकाश डाकी (30) या दोघांना सदर लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या कारवाईमुळे पनवेल परिसरात खळबळ उडाली आहे.
Comments
Popular posts
दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान...
Image
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
Image
महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल....
Image
खांदा कॉलनी युवासेने तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....
Image
मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केला जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धेत कांस्यपदक विजेते सुभाष पुजारी यांचा विशेष सत्कार....
Image