नवी मुंबई :- नवीमुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत अनेक मरीन अकॅडमी आणि शिपिंग कंपन्या आहेत, तसेच सिफेरर्स होस्टेलस आहेत ज्यात देशभरातून सिफेरर्स नोकरी आणि शिक्षणासाठी येतात. त्यांना नोकरीसाठी विदेशात जातात व आंतरराष्ट्रीय प्रवासी नियमानुसार त्यांना 'येलो फिवरची’ लस घेण सक्तीचे आहे. सध्या ते बी एम् सी च्या हॉस्पिटल मध्ये जावून घेतात. पण या वैश्विक महामारीच्या काळात ते अवघड झाले आहे. नवीमुंबई महानगर पालिकेच्या हॉस्पिटल्स मध्ये यल्लो फिवरची लस उपलब्ध झाल्यास सिफेरर्सचा बराच त्रास कमी होईल.
तसेच सिफेरर्सला जगभरातून फ्रंटलाइन वर्कर्स चा दर्जा दिला गेला आहे. नवी मुंबई सिफेरर्सना प्राधान्याने लसीकरण करण्यात यावे. कृपया जगभरातून मान्यता प्राप्त असलेलीच लस देण्यात यावी. तसेच पहिल्या आणि दुसऱ्या लसीत जास्तीत जास्त ४५ ते ६० दिवस अंतर असावे. जागतिक पातळीवर अनेक देश आणि शिपिंग कंपन्यांनी “No Vaccination No Job” हे धोरण अवलंबले आहे.
नवीमुंबई महानगर पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये 'येलो फिवर' ची लस उपलब्ध करून द्यावी व सिफेरर्स ला पालिकेच्या लसीकरण केंद्रवर कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरणा मध्ये प्राधान्य द्यावे ही अशी विंनती नवी मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांचा कडे ऑल इंडिया सिफेरर्स युनियन च्या वतीने करण्यात आली या वेळी अध्यक्ष संजय पवार , प्रमुख सल्लागार विजयजी घाटे , खजिनदार शितल मोरे , अफजल देवळेकर , संग्राम सोंडगे इ.उपस्थित होते