पनवेल / वार्ताहर :- नेरे विभागातील युवकांचे आधारस्तंभ आदरणीय स्व.जितेंद्र वामन पाटील यांच्या जयंतीनिमित्त नेरे येथील विजयालक्ष्मी मैदानावर शेतकरी कामगार पक्ष व जय हनुमान मित्र मंडळ नेरे यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी महिला आघाडी प्रमुख व अलिबाग नगरसेविका, पीएनपी संकुलाच्या कार्यवाह, दैनिक कृषीवलच्या संपादक सौ.चित्रलेखा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेल विधानसभा मतदारसंघाचे शेकापक्षाचे अध्यक्ष व पंचायत समितीचे सभापती काशीनाथ पाटील, रायगड जिल्हा परिषद सदस्य विलासशेठ फडके, पनवेल महानगरपालिकेचे जिल्हा चिटणीस नगरसेवक गणेशदादा कडू , शेकापक्षाचे पनवेल तालुका चिटणीस व मा.सभापती राजेश केणी, पंचायत समिती सदस्य स्वप्नील भुजंग, पुरोगामी युवक संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष देवा पाटील, पुरोगामी युवक संघटनेचे पनवेल तालुकाध्यक्ष सभापती पुरषोत्तमभाऊ भोईर, तालुका उपाध्यक्ष आमित भोईर, पनवेल तालुका सेक्रेटरी सुनील पाटील, युवा नेते सुनील वानखेडे, हँश किचन व वीणा वर्ल्डच्या मालकीण सौ.हर्षला योगेश तांबोळी, नेरे येथील शेकापक्षाचे जेष्ठ नेते वामनशेठ पाटील, संचालक मेघनाथ म्हसकर, मा.सरपंच बबन कदम, रमेश फडके, राम ठाकुर, जयराम गवते, संभाजी म्हसकर, नेरे ग्रामपंचायत सदस्य शंकर ठाकुर, सदस्य दर्शन ठाकूर, सदस्य सुनील पाटील, सदस्य प्रकाश घाडगे , डॉ. योगेश चिंचवडे, नेरे गावातील युवा नेते शैलेश पाटील, प्रसाद चोरघे, परेश म्हसकर, संदीप म्हात्रे, राहुल म्हसकर, सौरभ म्हसकर, प्रयाग मगर, किरण पाटील, गितेश पाटील, नितेश पाटील, रोशन पाटील, सागर ठाकुर, प्रवीण चोरघे, वरुण म्हसकर, शुभम सातपुते, सिंड्रस आरगुम, ध्येय जितेंद्र पाटील, जितु व जय हनुमान मित्र मंडळ नेरे यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली.