कार्यतत्पर नगरसेवक राजू सोनी यांनी तातडीने करून घेतली गटारांच्या झाकणांच्या दुरूस्तीसह रस्त्यातील खड्डे घेतले भरून....
पनवेल दि.17 (संजय कदम)- पनवेल महानगरपालिकेचेकार्यतत्पर नगरसेवक राजू सोनी यांनी लाईन आळी येथील हनुमान मंदिराजवळील गटारांच्या झाकणांची दुरूस्ती तसेच महानगरपालिके समोरील नुकत्याच पडलेल्या पावसामुळे रस्त्याला पडलेले खड्डे भरून घेतले आहेत.            
पनवेल शहरातील लाईन आळी येथील हनुमान मंदिरा जवळील गटारावरील झाकण गटाराच्या आत गेले होते त्यामुळे येथून ये जा करणाऱ्या लोकांना याचा त्रास होत आहे अशी माहिती येथील मंदिरात असणारे पुजारी यांनी नगरसेवक राजु सोनी सांगितले त्यांनी लगेच त्याचें स्वीय सहाय्यक मंदार देसाई यांना तेथे पाठवून ते काम तातडीने करून घेण्यास सांगितले. त्याचप्रमाणे पनवेल महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर सध्या पडत असलेल्या पावसामुळे रस्त्यांना खड्डे पडले होते. तत्परतेने त्याठिकाणी कामगार वर्ग पाठवून ते खड्डे बूजवून घेतल्याने परिसरातील नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत.            फोटोः रस्त्यावरील खड्डे घेतले बुजवून व गटारांची झाकणे दुरूस्ती
Comments